President Message
Mahalle Patil Sanstha-K.T Mahavidyalayaअध्यक्षांचे मनोगत
यवतमाळ जिह्यातील कळंब तालुक्यातील सावरगाव हा परिसर तसा आदिवासी डोंगराळ भाग असून या परिसरात
उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शिक्षण क्षेत्रात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात
काम करण्याचा योग आला आहे. त्या अनुभवातूनच आदिवासी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय
व्हावी या हेतूने सावरगाव येथे सन २०१८ साली के.टी. महाविद्यालय ची स्थपना करण्यात आली. ५ वर्षाच्या
अल्पावधीतच सुज्ञ पालक व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात आली.
शिवाय इतरही रोजगाराभिमुख उपक्रम महाविद्यालयात सातत्याने राबविण्यात येतात व त्याकरिता मार्गदर्शन
करण्यात येते.